आईने ‘यकृत’ देऊन वाचविले लेकीचे प्राण; भाजीविक्रेतीला मुख्यमंत्री निधीने दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:45 IST2025-10-18T11:44:21+5:302025-10-18T11:45:34+5:30

देवांशीची प्रकृती आता स्थिर असून,  आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे. असे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Mother saves daughter's life by donating 'liver'; CM's fund provides support to vegetable vendor | आईने ‘यकृत’ देऊन वाचविले लेकीचे प्राण; भाजीविक्रेतीला मुख्यमंत्री निधीने दिला आधार

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले लेकीचे प्राण; भाजीविक्रेतीला मुख्यमंत्री निधीने दिला आधार


मुंबई : सात वर्षांची देवांशी अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असून, उपचारासाठी २० लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’चा कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळाला. तसेच देवांशीच्या आईने यकृत दिल्यानंतर तिच्यावर यशस्वी उपचार झाले.

देवांशीची प्रकृती आता स्थिर असून,  आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे. असे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

अनेक दिवसांपासून होता ताप, पोटदुखीचा आजार
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड (बु.) येथे राहणारे रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. 

नागपूर येथे वैद्यकीय तपासणीनंतर, तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. प्रत्यारोपण गरजेचे असल्याचे सांगितले. 

अशी मिळाली मदत
देवांशीच्या वडिलांना मित्रांकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबत माहिती मिळाली. त्यांनी कक्षाकडे धाव घेतली. समाजमाध्यमांवरही मदतीसाठी आवाहन केले. 

कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपचाराची मोठी रक्कम उभी राहिली. उर्वरित रक्कम इतर काही सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांच्या वर्गणीतून गोळा करण्यात आली.

Web Title : माँ के लीवर ने बेटी की जान बचाई; मुख्यमंत्री कोष से सब्जी विक्रेता को मदद

Web Summary : एक सात वर्षीय लड़की को माँ के लीवर दान और मुख्यमंत्री राहत कोष से मिली वित्तीय सहायता से जीवन रक्षक लीवर प्रत्यारोपण मिला। लागत से जूझ रहे परिवार को आशा और समर्थन मिला, जिससे लड़की की रिकवरी और अस्पताल से छुट्टी हो गई।

Web Title : Mother's Liver Saves Daughter; Chief Minister's Fund Helps Vegetable Vendor

Web Summary : A seven-year-old girl received a life-saving liver transplant thanks to her mother's donation and financial aid from the Chief Minister's Relief Fund. The family, struggling with the cost, found hope and support, leading to the girl's recovery and discharge from the hospital.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.