प्रेयसीच्या वडिलांनीच केली हत्या

By Admin | Updated: March 27, 2016 01:27 IST2016-03-27T01:27:34+5:302016-03-27T01:27:34+5:30

अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीच्या वडिलांनीच तिच्या प्रियकराचा काटा काढल्याचे शिवडी येथील इजहारलाल हाश्मीच्या हत्याप्रकरणातून उघड झाले. या प्रकरणी शिवडी

The mother of the bridegroom murdered | प्रेयसीच्या वडिलांनीच केली हत्या

प्रेयसीच्या वडिलांनीच केली हत्या

मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीच्या वडिलांनीच तिच्या प्रियकराचा काटा काढल्याचे शिवडी येथील इजहारलाल हाश्मीच्या हत्याप्रकरणातून उघड झाले. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी ७२वर्षीय जगन्नाथ म्हात्रे यांना अटक केली आहे. इजहारलाल हाश्मीचा विवाह झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून नोकरीनिमित्त मुंबईतील शिवडी परिसरात तो राहत होता. त्याच परिसरातील म्हात्रे यांच्या मुलीसोबत त्याचे अनैतिक प्रेमसंबंध होते. लग्न झाले असतानाही मुलीसोबतच्या अनैतिक संबंधाला म्हात्रेचा विरोध होता. यामुळे जगन्नाथ यांचे हाश्मीसोबत खटके उडायचे. होळीच्या रात्री म्हात्रे आणि हाश्मीची दारू पार्टी रंगली होती. दरम्यान, म्हात्रेने त्याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मद्यपान केल्याने हाश्मी तोल जाऊन खाली कोसळला. याचाच फायदा घेत म्हात्रेने सुरुवातीला काठीने त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याची गळा दाबून हत्या केली. (प्रतिनिधी)

Web Title: The mother of the bridegroom murdered