Join us

जानेवारीत आढळले सर्वाधिक कोरोनारुग्ण; मात्र मृत्यूदर नियंत्रणात, आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 07:19 IST

राज्यातील चार जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या तुलनेत अधिक आहे.

मुंबई :  आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जानेवारीच्या १२ दिवसात मागील पाच महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णांचे निदान झाले आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या काळात मृत्यू दर नियंत्रणात होता. राज्यात २९ डिसेंबर ते ४ जानेवारी या काळात ६९,००८ रुग्ण आढळून आले आहेत. तर याच संख्येत २७३.६ टक्क्यांनी वाढ होऊन ५ ते ११ जानेवारीदरम्यान नवीन रुग्णांची संख्या २ लाख ५७ हजार ४४४वर पोहोचली आहे.

राज्यातील चार जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या तुलनेत अधिक आहे. या जिल्ह्यात ठाणे २९.५८ टक्के, मुंबई २८.२३ टक्के, पालघर २४.९३ टक्के व रायगड २३.३४ टक्के असे साप्ताहिक पॅझिटिव्हिटी दराचे प्रमाण आहे. २९ डिसेंबर ते ४ जानेवारीच्या दरम्यान राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. हे प्रमाण ६४,८६० इतके आहे. तर त्यानंतरच्या ५ ते ११ जानेवारीच्या काळात ही रुग्णसंख्या २,३०,८२२वर पोहोचली. या काळात नवीन कोरोना रुग्णांच्या प्रमाणात २५५.८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

२९ डिसेंबर ते ४ जानेवारीच्या दरम्यान राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण  ६४,८६० इतके आहे. तर त्यानंतरच्या ५ ते ११ जानेवारीच्या काळात ही रुग्णसंख्या २ लाख ३० हजार ८२२वर पोहोचली आहे. या कालावधीत  नवीन कोरोना रुग्णांच्या प्रमाणात २५५.८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस