Most celebrated celebrities in the presence of dignitaries will celebrate Gaurav Ceremony | मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ रंगणार गौरव सोहळा
मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ रंगणार गौरव सोहळा

मुंबई : स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असतो. तो हेरून अशा पर्सनॅलिटीज्चा गौरव करण्यासाठी ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड’ सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी हा सोहळा मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार, उद्योगजगतातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. हे या सोहळ्याचे दुसरे वर्ष असून यावेळी देखील विविध क्षेत्रातील मोस्ट स्टायलिश सेलिब्रेटींचा गौरव होणार आहे. यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिस्ट पर्सनालिटीलाच या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड किंवा मग टीव्ही, फॅशन आणि उद्योग जगतातील कोणतीही व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी ठरु शकते. त्यामुळे आगळ्यावेगळ्या ठरणाºया या पुरस्कार सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

‘स्टुडन्ट आॅफ द इयर फेम’ आणि तरुणाईची फेव्हरेट जोडी अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक -निमार्ता करण जोहर, रोहित शेट्टी, अभिनेत्री काजोल, कॉमेडीयन कपिल शर्मा, मनीष पॉल, मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर, स्नप्निल जोशी, अमृता खानविलकर, अंकुश चौधरी, निवेदिता सराफ, किशोरी शहाणे, आदिनाथ कोठारे, क्रांती रेडकर यांच्यासह अनेक दिग्गजांची या सोहळ्याला उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे केवळ स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा गौरव सोहळाच नाही तर सेलिब्रिटी मंडळींची अनेक गुपिते या अनोख्या पुरस्कार सोहळ्यामुळे जनतेसमोर येणार आहेत.


Web Title: Most celebrated celebrities in the presence of dignitaries will celebrate Gaurav Ceremony
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.