राज्यातील कोरोनाचा मृत्युदर २.७ पर्यंत घसरला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 06:24 IST2020-09-28T06:24:36+5:302020-09-28T06:24:46+5:30
कोरोना बरे होण्याचे प्रमाण 76.9 टक्के

राज्यातील कोरोनाचा मृत्युदर २.७ पर्यंत घसरला!
अकोला : राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असला, तरी सप्टेंबर अखेरपर्यंत मृत्युदर २.७ टक्क्यांवर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय, बरे होण्याचे प्रमाणही ७६.९ टक्क्यांवर पोहोचले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्याचा मृत्युदर २.७ टक्क्यांवर आल्याने दिलासा मिळाला आहे. एप्रिलमध्ये हाच मृत्युदर १२ एप्रिलला ७.५% झाला होता. मेपर्यंत मृत्युदर ४ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर तो कमी झाला.
महापालिका
सर्वाधिक मृत्यू
मुंबई ८,७५०
पुणे ३,४३७
नागपूर १,६५५
ठाणे १,०८३
पिंपरी चिंचवड १,००७
सर्वात कमी मृत्यू
चंद्रपूर ४८
परभणी ९७
अकोला १३५
मालेगाव १३९
अमरावती १४८
महाराष्ट्र आरोग्य विभागाने
२७ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वा. दिलेली आकडेवारी