मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी वाहतूक सहा दिवस बंद; ओहोटीमुळे लॉच सेवा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 03:44 AM2020-10-13T03:44:08+5:302020-10-13T03:44:13+5:30

साचलेला गाळ ठरतोय त्रासदायक

Mora-Bhau's push off sea passenger traffic for six days; No launch service due to low tide | मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी वाहतूक सहा दिवस बंद; ओहोटीमुळे लॉच सेवा नाही

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी वाहतूक सहा दिवस बंद; ओहोटीमुळे लॉच सेवा नाही

googlenewsNext

उरण : समुद्राच्या ओहोटीमुळे मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी लाँचेस १५ ते २० आॅक्टोबरदरम्यान सलग सहा दिवस दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रभाकर पवार यांनी दिली.

मोरा-भाऊचा धक्का या जलद आणि शॉर्टकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरी मार्गावरून दररोज कोरोनादरम्यानही शेकडो प्रवासी प्रवास करीत आहेत. सध्या मोरा बंदर गाळाने भरलेले आहे. गाळ साचल्याने समुद्राच्या ओहोटीमुळे प्रवासी बोटी जेट्टीपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी, उधाणाच्या ओहोटीदरम्यान या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक काही दिवस काही काळासाठी बंद ठेवण्याची पाळी येते. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते.

उधाणाच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी वाहतूक बंद पडणे ही बाब आता प्रवाशांच्याही अंगवळणी पडली आहे. यासाठी सागरी मार्गावरील प्रवासी लाँचेस १५ ते २० आॅक्टोबरदरम्यान सलग सहा दिवस दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रभाकर पवार यांनी दिली. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

मोरा-भाऊचा धक्का वाहतूक वेळापत्रक
१५ ऑक्टोबर दुपारी २.१५ ते संध्या. ५.०० बंद
१६ ऑक्टोबर दुपारी २.४५ ते संध्या. ५.४५ बंद
१७ ऑक्टोबर दुपारी ३.०० नंतर लाँचेस बंद
१८ आॅक्टोबर दुपारी ३.३० नंतर लाँचेस बंद
१९ आॅक्टोबर दुपारी ४.०० नंतर लाँचेस बंद
२० आॅक्टोबर दुपारी ५.०० नंतर लाँचेस बंद

Web Title: Mora-Bhau's push off sea passenger traffic for six days; No launch service due to low tide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.