Join us  

जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 10:55 AM

'मूड ऑफ द नेशन' असं या सर्वेक्षणाचे नाव आहे.  

कोरोना व्हायरसच्या संकटातही महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक पटकावून  देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याचा मान मिळवला आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. (Mood Of The Nation Survey)

'मूड ऑफ द नेशन' असं या सर्वेक्षणाचे नाव आहे.  देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील ग्रामीण व शहरी भागांतील लोकांची मतं या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. यापूर्वी जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून येत आहे. 7 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे चांगलं काम करत असल्याचे म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांचीही लोकप्रियता यावेळी वाढली आहे. जानेवारीत 18 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं आणि यंदा 24 टक्के लोकांनी हे मत व्यक्त केलं आहे.(Mood Of The Nation Survey)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 15 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर 11 टक्क्यांसह आंध्र प्रदेशचे वाय एस जगनमोहन रेड्डी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ममता बॅनर्जी व नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली आहे.  सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेसशासित राज्यांचे आहेत. ममता बॅनर्जी 9 टक्क्यांसह चौथ्या, तर उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार प्रत्येकी 7 टक्क्यांसह संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.  (Mood Of The Nation Survey)

टॅग्स :उद्धव ठाकरेयोगी आदित्यनाथअरविंद केजरीवालममता बॅनर्जीनितीश कुमार