टोल प्लाझावर आता मिळणार मासिक, वार्षिक पासची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 06:39 IST2025-10-26T06:39:35+5:302025-10-26T06:39:35+5:30
ही माहिती इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक प्रादेशिक भाषेत प्रदर्शित केली जाईल.

टोल प्लाझावर आता मिळणार मासिक, वार्षिक पासची माहिती
मुंबई : मासिक आणि वार्षिक टोल पासची माहिती देण्यासाठी टोल प्लाझावर माहिती प्रदर्शित केली जाईल, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) शुक्रवारी जाहीर केले.
एनएचएआयने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी प्रादेशिक कार्यालयांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व टोल प्लाझावर या टोल पासची तपशीलवार माहिती ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. वापरकर्त्यांना स्थानिक मासिक आणि वार्षिक पास सुविधेची उपलब्धता, दर आणि प्रक्रियांबद्दल योग्य माहिती देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही माहिती टोल प्लाझाचे प्रवेशद्वार, ग्राहक सेवा क्षेत्रे आणि प्रवेश / बाहेर पडण्याचे ठिकाण यासह प्रमुख ठिकाणी बोर्डवर प्रदर्शित केली जाईल.
ही माहिती इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक प्रादेशिक भाषेत प्रदर्शित केली जाईल. एनएचएआयने त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांना टोल प्लाझावर ३० दिवसांच्या आत हे फलक बसवण्याचे आणि टोल नियमांनुसार दिवसा आणि रात्री सर्व फलक स्पष्टपणे दिसतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.