Join us  

दिवंगत पोलीस पतीचे मिळणारे एका महिन्याचे निवृत्ती वेतन पुरग्रस्तांना देऊन केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 7:28 PM

दिवंगत पोलीस पतीचे मिळणारे निवृत्ती वेतन पतीच्या १६ व्या स्मृतीदिनी पोलीस पत्नी पौर्णिमा विष्णु काटकर यांनी पूरग्रस्तांसाठी दिले आहे.

मीरारोड: दिवंगत पोलीस पतीचे मिळणारे निवृत्ती वेतन पतीच्या १६ व्या स्मृतीदिनी पोलीस पत्नी पौर्णिमा विष्णु काटकर यांनी पूरग्रस्तांसाठी दिले आहे. काटकर यांचे पती विष्णु हे पोलीस दलात होते. वाहतुक पोलीस म्हणुन कर्तव्य बजावत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. त्यावेळी पौर्णिमा यांची दोन लहान मुलं होती.

पतीच्या मिळणाराया निवृत्ती वेतनावर तसेच जमेल तसं काम करुन त्यांनी बिकट आर्थिक परिस्थीत न डगमगता मुलांना मोठं केलं. त्यांना शिकवलं. त्यांची स्वत:ची एक सामाजिक संस्था असुन त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. त्यांच्या पतीच्या निधनास सोळ वर्ष झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पूरा मुळे झालेल्या अपरीमित हानी मुळे व्यथीत झालेल्या काटकर यांनी आपले सुध्दा पूरग्रस्तांच्या पुर्नवसनात उत्तरदायित्व म्हणुन हातभार लावण्याचा निर्णय घेतला.

आर्थिक स्थिती सबळ नसली तरी पौर्णिमा यांनी पतीच्या स्मृति निमीत्त त्यांच्या मुळे मिळणारे एक महिन्याचे निवृत्ती वेतन पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले. नुकताच निवृत्ती वेतनाच्या रकमेचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कडे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावे सुपुर्द केला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. निवृत्ती वेतनाची रक्कम फारशी नसली तरी आपल्या कुटुंबासाठी ती खुपच मोलाची आहे. पण पूरग्रस्तांसाठी आपलं कर्तव्य म्हणुन जमेल तेवढं सहकार्य प्रत्येकाने केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या.

टॅग्स :पूरपोलिसवाहतूक पोलीसराष्ट्रवादी काँग्रेस