Join us  

भांडुपमध्ये उडणारा राक्षस; चतुर, ड्रॅगन फ्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 3:58 PM

Mumbai Environment : संपूर्ण भारतात पाणथळ जागी प्रजाती आढळते

मुंबई : चतुर; ड्रॅगन फ्लाय याच्या शेकडो प्रजाती भारतात आढळतात. संशोधक यामध्ये बरेच काम करीत असून, त्यांना नवीन प्रजाती आढळत आहेत. विशेष म्हणजे मुंबईतल्या भांडुप परिसरात देखील चतुर; ड्रॅगन फ्लाय याच्या प्रजाती आढळत असून, निसर्ग प्रेमींना याचा आस्वाद घेता येत आहे. निसर्ग मित्र विजय अवसरे यांच्या म्हणण्यानुसार, चतुर; ड्रॅगन फ्लाय याला आपण उडणारा राक्षस म्हणू. चतुर हवेत उडता उडता आपले भक्ष हवेतच पकडतात. छोटे कीटक, माशी, मच्छर पकडून खातात. म्हणून इंग्रजीत त्यांना ड्रॅगन फ्लाय असे म्हणतात.

पाणथळ जागा व तेथील गवताळ कुरणे हे त्यांचे आवडते ठिकाण होय. पाणथळ जागेत ते आपली अंडी पान वनस्पतीवर लावतात. आणि  याची आळी पाण्यात वाढत असतानाच पाण्यातील इतर पान कीटक, छोटे मासे पकडून खाते. चतुराच्या शेकडो प्रजाती जगात आढळतात. चतुर मानवाला अपायकारक ठरणार छोटे कीटक, मच्छर खात असल्याने मानवाचे मित्र म्हणावयास हरकत नाही? असेही अवसरे यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणेज भांडुप परिसरात आढळत असलेल्या चतुर; ड्रॅगन फ्लायच्या प्रजाती यांचे काही फोटो अवसरे यांनी लोकमतला दिले असून, मुंबईत देखील हिरवळ असलेल्या परिसरात ते मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :पर्यावरणमुंबईनिसर्गहवामान