मुंबईकरांचा मान्सून संडे; फुल टू धम्माल, मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:25 AM2019-07-01T03:25:46+5:302019-07-01T03:25:59+5:30

शहरामध्ये पावसाला सुरुवात झाल्यावर मुंबईकर आपसूकच समुद्र किना-याच्या दिशेने ओढले जातात.

Monsoon Sunday of Mumbai; Full to death, fun | मुंबईकरांचा मान्सून संडे; फुल टू धम्माल, मस्ती

मुंबईकरांचा मान्सून संडे; फुल टू धम्माल, मस्ती

Next

मुंबई : जिथवर नजर जाईल, तिथवर पावसाने केलेला काळोख, वाऱ्याच्या वेगाने वाहणारे मान्सूनचे ढग, समुद्राच्या लाटांवर स्वार होत बेभान झालेला वारा, सळसळणारी झाडांची पानं, चार मीटरहून अधिक उंचीच्या उसळणा-या व फेसळणा-या लाटा आणि यात बेधुंद झालेली मुंबईकर तरुणाई, असे काहीसे चित्र रविवारी मुंबईच्या समुद्र किनारी पाहण्यास मिळाले. गेट वे पासून मरिन ड्राइव्ह आणि गिरगाव चौपाटीवर मान्सून मूड सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईकर सरसावले होते. अबालवृद्धांसह पर्यटकांच्या गर्दीने मान्सून संडे ओव्हर फ्लो झाला होता. समुद्राला आलेल्या भरतीप्रमाणे सकाळपासून सायंकाळपर्यंत वाढत असलेली दर्दी-गर्दी मान्सूनकरांची असल्याचे चित्र होते.
शहरामध्ये पावसाला सुरुवात झाल्यावर मुंबईकर आपसूकच समुद्र किना-याच्या दिशेने ओढले जातात. आठवड्यातील शनिवार आणि रविवारी या दिवशी मुंबईचे समुद्र किनारे हाउस फुल्ल झाल्याचे चित्र दिसून येते. रविवारच्या मेगाब्लॉकची तमा न बाळगता मरिन लाइन्स व गिरगाव चौपाटीवर पावसाची मज्जा लुटण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी
केली होती.
गिरगाव चौपाटी व मरिन लाइन्स येथे बच्चे कंपनी, पे्रमीयुगूल, कुटुंबीयांनी पावसाच्या रीपरीपमध्ये भिजून मनसोक्त आनंद लुटला, तसेच मरिन लाइन्सचा कट्टाही मुंबईकरांमुळे दिसेनासा झाला होता. सध्या तरुणाईमध्ये फोटोग्राफीचे वेड जास्त असून, समुद्र किनाºयावर सेल्फी काढण्यात तरुणाई मग्न झाली होती. यावेळी मुंबईतील कानाकोपºयातून नागरिक पावसाचा आणि समुद्राच्या लाटांचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होती, तसेच गिरगाव चौपाटीवर लहान मुले वाळूचे घर बनविण्यात दंग झाली होती. त्याचबरोबर, पावसामध्ये मोबाइल भिजू नये. यासाठी मोबाइल प्लॅस्टिक कव्हर विकणाऱ्यांची ओरड सुरू होती. यावेळी पावसात गरमागरम मक्याची कणसे खाण्यासाठी मके विक्रेत्यांकडे मका घेण्यासाठी झुंबड उडाली
होती.

खोल पाण्यात प्रवेश नाकारल्यानंतरही पर्यटकांची गर्दी
मरिन लाइन्स येथे समुद्राला भरती आल्यावर समुद्राच्या लाटा रस्त्यावर येऊन धडकतात. याचा अनुभव घेण्यासाठी मुंबईकर वर्षभर वाट पाहतो. या लाटांचा मारा अंगावर घेण्यासाठी तरुणाई बेधुंद झाली होती. गिरगाव चौपाटीवर खोल समुद्रामध्ये प्रवेश नाकारला जात होता. तरीही पर्यटकांची येथे गर्दी वाढतच होती.
चौपाटीवर पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले होते. त्या पाण्यात बच्चेकंपनी उड्या मारत मज्जा-मस्ती करत आनंदोत्सव साजरा करत होती. तरुण मुले फुटबॉल, क्रिकेट, हॉलीबॉल इत्यादी खेळांचा आनंद घेत होते.

सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावून त्याला दोरी बांधण्यात आली होती, तसेच गिरगाव चौपाटीवर जीवरक्षकांचा पहारा होता. दरम्यान, मुंबईकरांनी रविवारीच्या सुट्टीमध्ये पाऊस आणि समुद्र किनाºयांचा आस्वाद घेत घराच्या दिशेने रवाना झाली.

अहमदाबादवरून मुंबईत सीए इंटर्नशिप करण्यासाठी आलो आहे. सध्या अंधेरी येथे राहतो. मुंबईतला माझा पहिला पाऊस आहे. मरिन लाइन्स आणि गिरगाव चौपाटी येथे पहिल्या पावसाची मज्जा अनुभवण्यासाठी व फिरण्यासाठी आलो आहे. आठवड्याभराचा थकवा दूर करण्यासाठी बरेच मुंबईकर समुद्र किनारी येऊन रिलॅक्स होतात. अहमदाबादला असताना फिरण्यासाठी उदयपूर येथे जायचो, परंतु मुंबईमधली पावसाळ्यातली मज्जा काही औरच आहे. मुंबईच्या समुद्र किनाºयालगत गगनचुंबी इमारती असल्याने एक वेगळेच चित्र अनुभवायला मिळाले.
- सय्यम हुरकट, पर्यटक

गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाळ्यामध्ये आमच्या मराठा वॉरियर्स ग्रुपची मुले-मुली मरिन लाइन्सला फिरण्यासाठी येतो. मरिन लाइन्सला येऊन फोटोग्राफी आणि खूप साºया सेल्फी काढतो. आमचा ग्रुप मोठा असून, काही मित्र कामानिमित्त येऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही पाच जण आलो आहोत. समुद्र किनारी येऊन पावसात भिजून खूपच एन्जॉय केला आहे.
- प्रमित माने, कांदिवली

Web Title: Monsoon Sunday of Mumbai; Full to death, fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई