Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून श्रीलंकेत दाखल; १३ जूननंतर मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 02:34 IST

मान्सून मुंबईत दाखल होण्यास १३ जून ओलांडण्याची शक्यता आहे.

मुंबई : मान्सून दक्षिण श्रीलंकेसह दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, बंगालच्या खाडीच्या काही भागासह उत्तर अंदमानच्या भागात दाखल झाला आहे. या आठवड्यातच मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज आहे. मान्सून मुंबईत दाखल होण्यास १३ जून ओलांडण्याची शक्यता आहे.

५ आणि ६ जून : मुंबई आणि आसपास आकाश सामान्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

टॅग्स :पाऊस