‘मोनो डार्लिंग’ झटकून टाकणार महसुली मरगळ; तिकिटामागे छापणार रंगारंग जाहिराती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 08:49 AM2023-12-22T08:49:41+5:302023-12-22T08:50:01+5:30

आता उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी मोनो रेल्वेने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या तिकिटांच्या मागे जाहिरात छापण्याचा निर्णय घेतला आहे.

'Mono Darling' will shake the revenue dead; Colorful advertisements will be printed on the back of the ticket | ‘मोनो डार्लिंग’ झटकून टाकणार महसुली मरगळ; तिकिटामागे छापणार रंगारंग जाहिराती

‘मोनो डार्लिंग’ झटकून टाकणार महसुली मरगळ; तिकिटामागे छापणार रंगारंग जाहिराती

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांनी पाठ फिरविलेल्या मोनो रेलला आता महसुलाची चणचण भासत आहे. त्यामुळे महसूलवाढीसाठी तिकिटाच्या मागे जाहिरात छापण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एमएमआरडीकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. 

चेंबूर ते जेकब सर्कल असा मोनोचा प्रवास गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मोनो रेल्वेचा तिकीट हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मोनोरेलचे उत्पन्न कमी आहे. प्रवाशांची संख्या वाढावी तसेच उत्पन्नात भर पडावी म्हणून मोनोरेलने फेऱ्यांमध्ये वाढ केली होती. 

 दैनंदिन प्रवासी  २५ हजार 
मोनो रेल्वेचा वार्षिक खर्च सुमारे ५४२ कोटींच्या घरात आहे, तर प्रवासी वाहतुकीतून मिळणारे वार्षिक उत्पन्न फक्त १४ कोटी रुपये आहे. 
 मोनो रेल्वेची दैनंदिन प्रवासी संख्या २५ हजारांच्या घरात असून, 
मोनो रेल्वेला जाहिरातीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

आता उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी मोनो रेल्वेने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या तिकिटांच्या मागे जाहिरात छापण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: 'Mono Darling' will shake the revenue dead; Colorful advertisements will be printed on the back of the ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.