‘मनीएज’च्या मालमत्ता जप्त, १७ बँक खातीही गोठविण्यात आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:42 IST2025-01-18T10:59:33+5:302025-01-18T12:42:11+5:30

आरोपींनी  २०११ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत वायदे बाजार आणि बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करतो, यात बराच नफा होतो.

MoneyAge's assets seized, 17 bank accounts frozen | ‘मनीएज’च्या मालमत्ता जप्त, १७ बँक खातीही गोठविण्यात आली

‘मनीएज’च्या मालमत्ता जप्त, १७ बँक खातीही गोठविण्यात आली

मुंबई : मनीएज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने रायगडमधील १६ एकरांच्या चार भूखंडांसह ठाणे, विरारमधील ८ फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, १६ ते १७ बँक खातीही गोठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घोटाळ्यातील फसवणुकीचा आकडा २८ कोटींवर पोहोचला असून, तक्रारी नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी स्वतंत्र टीम काम करत आहे. जवळपास १५० ते २०० गुंतवणूकदार पुढे आले आहेत.

आरोपींनी  २०११ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत वायदे बाजार आणि बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करतो, यात बराच नफा होतो. कंपनीच्या माध्यमातून पैसे गुंतवल्यास महिना दोन टक्के किंवा वर्षाला २४ टक्के या दराने परतावा देऊ, असे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले.

जाधवचा शोध सुरू
कंपनीच्या भागीदार आणि प्रमुख आरोपींपैकी असलेल्या प्रिया प्रभू यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. यावर २२ तारखेला सुनावणी होणार आहे. तसेच त्यांना तपासाला सहकार्य करण्यास सांगण्यात आले असून, त्यानुसार त्यांचा जबाब नोंदवून घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; तर, मास्टरमाइंड राजीव जाधवचा शोध सुरू आहे. 

मालमत्ता कुठे?
आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत श्रीवर्धनमधील पाच एकर जमिनीसह पालीतील ११ एकरांच्या तीन भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, ठाणे, टिटवाळा, विरारसह विविध ठिकाणांतील आठ फ्लॅटवर जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: MoneyAge's assets seized, 17 bank accounts frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.