मॉडेलला मारहाण करीत केला विनयभंग, मित्रावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 01:25 IST2019-07-16T01:25:34+5:302019-07-16T01:25:46+5:30

किरकोळ वादातून मॉडेलला तिच्या मित्राने मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सोमवारी साकीनाका पोलिसांनी मित्र झोएब खान (२५) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Molestation of the model, molestation, a complaint against a friend | मॉडेलला मारहाण करीत केला विनयभंग, मित्रावर गुन्हा दाखल

मॉडेलला मारहाण करीत केला विनयभंग, मित्रावर गुन्हा दाखल

मुंबई : किरकोळ वादातून मॉडेलला तिच्या मित्राने मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सोमवारी साकीनाका पोलिसांनी मित्र झोएब खान (२५) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
खान याच्याविरुद्ध यापूर्वीदेखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असून, यात आरोपपत्रही तयार करण्यात आले आहे. तक्रारदार मॉडेल ही खानची मैत्रीण असून ते दोघे एकत्र राहतात. सोमवारी एका हॉटेलमध्ये ते दोघे एकत्र गेले होते. तेव्हा काही कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि खानने तिला मारहाण केली. त्यानंतर तिने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
‘तरुणीचा जबाब आम्ही नोंदवून घेतला असून, त्यात तिने खानवर विनयभंगाचा आरोप केला आहे, त्यानुसार त्याच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे,’ अशी माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी दिली. काही महिन्यांपूर्वीदेखील खान आणि या तरुणीत वाद झाले होते. तेव्हाही त्याच्यावर गुन्हा दाखल करीत आम्ही आरोपपत्र तयार केले होते. मात्र नंतर त्या दोघांमधील भांडण मिटले आणि ते पुन्हा एकत्र झाले, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या आम्ही खानचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असे सावंत यांनी नमूद केले.

Web Title: Molestation of the model, molestation, a complaint against a friend