Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये ओलावा; मुंबईला पुन्हा प्रदूषणाच्या ढगांनी वेढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 06:33 IST

Mumbai Weather News: मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानात सातत्याने बदल होत असून अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये पुन्हा एकदा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवेत तरंगणारी प्रदूषके, सूक्ष्म कण अडकून पडत असून मुंबईची हवा शुक्रवारी पुन्हा एकदा प्रदूषित नोंदवण्यात आली.

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानात सातत्याने बदल होत असून अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये पुन्हा एकदा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवेत तरंगणारी प्रदूषके, सूक्ष्म कण अडकून पडत असून मुंबईची हवा शुक्रवारी पुन्हा एकदा प्रदूषित नोंदवण्यात आली.

समुद्रावरून मुंबईकडे वाहणारी हवा सध्या स्थिर असल्याने प्रदूषक कण एकाच ठिकाणी साचून राहत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे.  फेब्रुवारी सुरू होत असताना आणि हिवाळा कमी होण्याची चिन्हे दिसत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण घटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषणाचे हे संकट २ फेब्रुवारीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य मुंबई, पश्चिम उपनगरांमध्ये गगनचुंबी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Moisture from Arabian Sea Worsens Mumbai Pollution; City Shrouded Again

Web Summary : Mumbai's air quality deteriorates as moisture from the Arabian Sea traps pollutants. Construction and infrastructure projects exacerbate the issue. Pollution is expected to persist until February 2nd despite hopes of winter's end, according to experts.
टॅग्स :मुंबईहवामान अंदाज