Join us  

मोदींची मुलाखत ही तर 'फिक्स मॅच', जितेंद्र आव्हाडांची चपराक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 10:51 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत, मोदींनी अनेक बाबींवर चर्चा केली.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. क्रिकेट मॅचमध्ये फिक्सींग असतं, हे मी यापूर्वी ऐकलं होतं. पराभूत मानसिकतेनं मोदींनी दिलेली मुलाखत म्हणजे तरुणांच्या भाषेत सांगायचं झाल्यास सेटींग आहे. तर ही मुलाखत म्हणजे फिक्स मॅचच, असा घाणाघाती आरोप आव्हाड यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत, मोदींनी अनेक बाबींवर चर्चा केली. जीएसटी, राम मंदिर, नोटाबंदी, 5 राज्यातील निवडणुकांमध्ये झालेला पराभव, सबरीमला मंदिर प्रवेश यांसह अनेक विषयांवर मोदींनी भाष्य केलं. मात्र, मोदींच्या या मुलाखतीची विरोधकांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांनी मोदींनी ही मुलाखत फिक्स होती. तसेच आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचं झाल्यास ही मुलाखत म्हणजे सेटिंग होती, असे आव्हाड म्हणाले. मोदींची मुलाखत ही पत्रकार परिषद नव्हती, ती मुलाखत सेटींग होती, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मोदींची मुलाखत म्हणजे परीक्षार्थी विद्यार्थ्याकडून अगोदर प्रश्नपत्रिका सेक करणे असेच आहे, त्यामुळे परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवून विद्यार्थी निकालाचे सेलिब्रेशन करणार, अशीही खिल्ली आव्हाड यांनी उडवली आहे.

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमुंबईनरेंद्र मोदी