Join us  

महाराष्ट्र सीआयडी वेबसाईट हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 11:22 AM

गुगलवरून लिंक उघडण्याचा प्रयत्न केल्यास ती हॅकरचा 'सीआयडी डिपार्टमेंट वेबसाईट हॅक' असा संदेश येत आहे.

मुंबई - राज्य गुन्हे प्रकटीकरण शाखेची वेबसाईट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार संबंधित विभाग याप्रकरणी चौकशी करत आहे. सायबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची mahacid.gov.in या लिंकवर क्लिक केल्यास ती ओपन होत आहे. मात्र गुगलवरून हिच लिंक उघडण्याचा प्रयत्न केल्यास ती हॅकरचा 'सीआयडी डिपार्टमेंट वेबसाईट हॅक' असा संदेश येत सरकारला उद्देशुन इमाम महदी नामक व्यक्तीच्या नावे एक मेसेज येतो.

मेसेजमध्ये भारतीय पोलीस आणि मोदी सरकारला चेतावनी देत 'मुस्लिम समाजाला त्रास देणे बंद करा, ते सर्वत्र आहेत. मुस्लीम बांधवांच्या शक्तीची कल्पना असून द्या, लवकरच इमाम माहदी येत आहे' अशा आशयाच्या मजकूरही त्यात आहे. त्यानुसार नेमका हा काय प्रकार आहे याची चौकशी संबंधित यंत्रणा करत असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र बजेट 2020 Live: अजित पवारांकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात

एका मिनिटात ४ लाख कोटी स्वाहा; येस बँक, कोरोनामुळे शेअर बाजार गडगडला

China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'

८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द

महाविकास आघाडी सरकारच्या विविध मंत्र्यांनी १०० दिवसांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

 

टॅग्स :महाराष्ट्र