महिला ‘मोबाइल चोर’ टोळी गजाआड : २५ मोबाइल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:52 IST2017-09-07T02:51:59+5:302017-09-07T02:52:12+5:30

रेल्वे स्थानकावर आणि धावत्या लोकलमध्ये गर्दीत मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या परिस्थितीत कुर्ला रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेशच्या सराईत महिला मोबाइल चोर टोळीला बुधवारी बेड्या ठोकल्या.

 Mobile 'mobile thief' gang gangs: 25 mobile gains | महिला ‘मोबाइल चोर’ टोळी गजाआड : २५ मोबाइल हस्तगत

महिला ‘मोबाइल चोर’ टोळी गजाआड : २५ मोबाइल हस्तगत

मुंबई : रेल्वे स्थानकावर आणि धावत्या लोकलमध्ये गर्दीत मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या परिस्थितीत कुर्ला रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेशच्या सराईत महिला मोबाइल चोर टोळीला बुधवारी बेड्या ठोकल्या. बसंतीबाई चौहान (५४), सोनिया मोगिया (२६) आणि राजाबाई मोगिया (३१) अशी या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख ९४ हजार ८४ रुपये किमतीचे एकूण २५ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.
मूळच्या मध्य प्रदेश येथील राहणाºया या तिघी मुंबईत वास्तव्याला होत्या. या तिन्ही महिला बेरोजगार आहेत. रेल्वे स्थानक आणि धावत्या रेल्वेतील विशेषत: महिला डब्ब्यात या तिन्ही सराईतपणे प्रवाशांचे मोबाइल लंपास करत होत्या.
बुधवारी कुर्ला रेल्वे स्थानकात त्या संशयास्पद हालचाली करत असताना आढळून आल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र चव्हाण यांच्यासह
त्यांच्या पथकाने निर्भया पथकाच्या साहाय्याने या आरोपी महिलांना ताब्यात घेतले.

Web Title:  Mobile 'mobile thief' gang gangs: 25 mobile gains