मोबाइल दुरुस्तीसाठी दिला अन् बँक खात्यातून दोन लाख गायब! अशा वेळी काय करायचं? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 10:32 IST2025-09-16T10:31:48+5:302025-09-16T10:32:17+5:30
तक्रारदार लोअर परळ येथे कुटुंबासह राहतात. लोअर परळ रेल्वे स्थानकासमोर त्यांची डेअरी आहे. मोबाइल गरम होत असल्याने त्यांनी २३ ऑगस्टला दादर पश्चिमेकडील अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये दुपारी १ वाजता दुरुस्तीसाठी दिला.

मोबाइल दुरुस्तीसाठी दिला अन् बँक खात्यातून दोन लाख गायब! अशा वेळी काय करायचं? वाचा...
मुंबई : लोअर परळ येथील डेअरी व्यावसायिकाला मोबाइल दुरुस्तीस देणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १.९९ लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिस तपास करत आहेत.
तक्रारदार लोअर परळ येथे कुटुंबासह राहतात. लोअर परळ रेल्वे स्थानकासमोर त्यांची डेअरी आहे. मोबाइल गरम होत असल्याने त्यांनी २३ ऑगस्टला दादर पश्चिमेकडील अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये दुपारी १ वाजता दुरुस्तीसाठी दिला. मोबाइलसोबत त्यात सिम कार्डही होते. रिसेप्शनिस्टने फोनचा लॉक कोड विचारून लिहून घेतला. दुपारी ४:३० वाजता त्यांनी मोबाइल परत घेतला असताना सॉफ्टवेअर अपडेट केल्याचे सांगण्यात आले.
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
त्यानंतर दोन दिवसांनी बँक खाते तपासताच त्यातून एक लाख ९९ हजार रुपये काढल्याची माहिती मिळताच त्यांना धक्का बसला. २३ तारखेला ९९ हजार रुपये आणि २५ तारखेला दोन व्यवहारांत एक लाख रुपये बँक खात्यातून वळते झाले. बँकेत चौकशी करताच फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
१९३० या हेल्पलाइनवर व पोलिसांत तक्रार देण्यात आली.