Join us

‘मनसे’ची तीन जागांची मागणी, दोन जागांवर चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:05 IST

महायुतीतील सहभागाबाबत मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पार पडली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीकडे तीन जागांची मागणी केली आहे. मात्र, आता दोन जागांवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. या जागांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील आणि जागाही त्यांनाच माहीत असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

महायुतीतील सहभागाबाबत मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पार पडली. याविषयी नांदगावकर म्हणाले, राज यांनी काही जागा ठरवलेल्या असतील. त्यांना काही खात्री असेल, अशा जागा त्यांनी मागितल्या आहेत. यासंदर्भात अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

टॅग्स :राज ठाकरेमनसेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४