Join us

मनसेने गोरेगावात पुस्तक भंडारामधील हिंदी पुस्तकांवर शाई टाकून केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:47 IST

हिंदी पुस्तकांचे वितरण करू नका असे ठणकावून सांगितले.

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व प्राथमिक शाळेत हिंदी विषयाचा सक्तीचा तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी काल गोरेगाव पश्चिम, उद्योग नगर येथील बालभारती (पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र - महाराष्ट्र राज्य) मध्ये भेट देऊन पुस्तक भंडारा मधील हिंदी पुस्तकांवर शाई टाकून निषेध केला व त्यांना हिंदी पुस्तकांचे वितरण करू नका असे ठणकावून सांगितले.

यासोबतच, राज ठाकरे यांनी हिंदीला सक्त विरोध करत महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र दिले होते. सदर पत्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी गोरेगांव विधानसभेतील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले. या प्रसंगी मनसेचे गोरेगाव मधील मनसेचे गोरेगावमधील सर्व महिला पुरुष पदाधिकारी आणि अंगीकृत सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :मनसेराज ठाकरेहिंदीमराठी