Join us  

मनसेची पाटी कोरी... एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:40 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार  शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. 

ठळक मुद्देमनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेशशरद सोनावणे यांनी जुन्नरमध्ये विजय मिळवत मनसेची लाज राखली होती. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारल्याने शरद सोनावणे यांनी शिवसेना सोडून मनसेत प्रवेश केला होता.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्यातील एकमेव आमदार  शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शरद सोनावणे यांनी सोमवारी  शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. याला आता पूर्णविराम मिळाला आहे. 

2009 मध्ये मनसेचे तेरा आमदार होते. मात्र 2014 मध्ये हा आकडा एकवर आला. शरद सोनावणे यांनी जुन्नरमध्ये विजय मिळवत मनसेची लाज राखली होती. मात्र, आता मनसेचा हा एकमेव आमदार देखील शिवसेनेत गेल्यामुळे मनसेची विधानसभेतील पाटी कोरी झाली आहे. शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते, मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेना सोडून मनसेत प्रवेश केला होता.

दरम्यान, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केल्यानंतर आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शरद सोनावणे यांनी म्हटले होते. नारायण गाव येथे शरद सोनावणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शिवसेनेत प्रवेशाबद्दल मला विचारणा करत असल्याने मी हा निर्णय घेत असल्याचेही शरद सोनावणे यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :मनसेशिवसेनाउद्धव ठाकरेराज ठाकरे