Join us  

मनसेला धक्का; अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 1:45 PM

ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाकडून अविनाश जाधव यांचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे.

मुंबई: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस  कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाने अविनाश जाधव यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे मनसेला एक प्रकारचा धक्काच असल्याचे सांगण्यात येत आहे.

तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले...

मनसेचे नेते नितीन सरदेसाई देखील आज न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित होते. नितीन सरदेसाई यांनी न्यायालयाच्या सुनावणीबाबत महिती देताना सांगितले की, अविनाश जाधव यांच्यावर ३५३ चं कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे ३५३ प्रकरणातील गुन्ह्यांची सुनावणी सत्र न्यायालयात होते. त्यामुळे याबाबत सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे अविनाश जाधव यांना 6 ऑगस्टपर्यत न्यायालयिन कोठडी मिळाली असून त्यांची तळोजा तुरुंवासात रवानगी करण्यात आली आहे. अधीनस्थ न्यायालयाच्या या आदेशानूसार आम्ही आता सत्र न्यायालयात अविनाश जाधव यांना जामीन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला असून 6 ऑगस्टला याबाबत सुनावणी होणार असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

अविनाश जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच अविनाश जाधव यांनी ठाणे महानगपालिकेने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचा दावा केला आहे. महापालिकेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत अविनाश जाधव यांनी महापालिकेच्या गेटजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. मात्र अविनाश जाधव यांनी साधर केलेल्या CCTV व्हिडिओमध्ये त्यांची गाडी गेटजवळ थांबलीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गाडी गेटजवळ थांबलीच नाही मग मी कोणाल्या शिव्या दिल्या, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

दरम्यान, ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर अविनाश जाधव म्हणाले की, याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मागची अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना त्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यासं सांगितलं आहे.

Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य

जिल्ह्यात इतके गुंड आहेत त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे असा आरोप त्यांनी केला.तसेच माझ्या सुरुवातीच्या सभेत मी म्हटलं होतं मला पोलीस तडीपारीची नोटीस बजावतील, आज ती नोटीस मला मिळाली. लोकांसाठी भांडायचं नाही का? लोकांसाठी आंदोलन करताना तडीपारीची नोटीस हे महाराष्ट्र सरकारचं बक्षीस आहे, कोकणासाठी मोफत बस सोडणार म्हणून हे बक्षीस आहे, लोकांचे, पोलिसांच्या समस्या प्रखरतेने मांडले त्याचं हे बक्षीस आहे. त्यामुळे यापुढे लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवावं. नोटीस आली म्हणून थांबणार नाही तर लोकांना न्याय देण्याचं काम करणारच असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :अविनाश जाधवमनसेठाणेन्यायालय