MNS leader Ameya Khopkar has warned Jaan Kumar Sanu and Colors channel | ...तर उद्यापासून 'बिग बॉस'चं शूटिंग बंद; मनसेचा जान कुमार सानूसह कलर्सलाही इशारा

...तर उद्यापासून 'बिग बॉस'चं शूटिंग बंद; मनसेचा जान कुमार सानूसह कलर्सलाही इशारा

मुंबई: गायक जान कुमार सानूला मनसेनं थेट धमकी दिली आहे. मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं बिग बॉसमध्ये केलं. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जान कुमार सानू याच्यासह कलर्स वाहिनीलाही इशारा दिला आहे. 

अमेय खोपकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस सुरु आहे. मात्र सध्या सुरु असलेलं  १४ व्या हंगाम लोक फारसे बघत नाही. त्यामुळे टीआरपी मिळत नाही. त्यासाठी कलर्स मराठीने हा स्टंट केलेला आहे. जान कुमार सानूचं हे वाक्य वाहिनीला एडिट करत आलं असतं. मात्र त्यांनी टीआरपीसाठी हे वाक्य वगळलं नाही, असा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे. 

मी वाहिनीला फोन करुन या संदर्भात जाब विचारलेला आहे, अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे. तसेच जान कुमार सानूने येत्या २४ तासांत 'बिग बॉसच्या शो'मध्ये माफी मागितली नाही तर, उद्यापासून बिग बॉसचं शूटिंग बंद करु, असा इशारा देखील अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता जान कुमार सानू काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जान कुमार सानूनं म्हटलं होतं. 

कोण आहे जान कुमार सानू?

जान कुमार सानूचं मूळ नाव जयेश भट्टाचार्य आहे. तो प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आहे. संगीत क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकायचं असल्यानं मी माझ्या नावापुढे त्याचं नाव लावतो, असं जाननं टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MNS leader Ameya Khopkar has warned Jaan Kumar Sanu and Colors channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.