Join us  

"मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 8:59 PM

महाविकास आघाडी सरकारवर शेलक्या शब्दांत हल्ला चढवणारे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज एक खास ट्विट केलं आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जुळवून घेऊन युती करण्यासंदर्भातील लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असताना मनसेच्या एका नेत्याचं ट्विट देखील आता चर्चेचा विषय ठरू लागलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर शेलक्या शब्दांत हल्ला चढवणारे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज एक खास ट्विट केलं आहे. 

"माझ्या महाराष्ट्रात राजकारण्यांचे सत्तेसाठी सुरू असलेले किळसवाणे 'प्रताप' बघितले की पुन्हा एकदा खात्री पटते..."मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..." हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल", असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल, असं अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अमेय खोपकर यांनी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी राज ठाकरे यांचा एक हटके फोटो देखील ट्विट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे चक्क टी-शर्ट, उठावदार रंगाचं जॅकेट आणि जीन्समध्ये दिसत आहेत. 

प्रताप सरनाईकांच्या पत्रानं उडालीय खळबळभारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना कालच पक्षप्रमुख उद्दव ठाकरेंनी स्वबळाची भाषा केल्यास जनता चपलेनं हाणेल, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनं राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस एकला चलो रे ची भूमिका सातत्यानं घेत आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत आहे. अशा परिस्थितीत आपण भाजपसोबत जुळवून घ्यायला हवं, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेउद्धव ठाकरेप्रताप सरनाईक