Join us  

...अन् रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी डोकं टेकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 2:16 PM

अपेक्षित उत्तरं न मिळाल्यानं व्यक्त केली नाराजी

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी रेल्वेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडेंनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे डोकं टेकत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्यानं अमित ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. अमित ठाकरेंनी मनसेच्या शिष्टमंडळासह महाव्यवस्थापकांची भेट घेत सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. रेल्वेत महिला प्रवासी सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरे म्हणाले. सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही पुरेसे नाहीत. तर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणंदेखील गरजेचं असल्याचं अमित म्हणाले. दर रविवारी मेगाब्लॉक असतो. तरीही पावसाळ्यात वारंवार लोकलची रखडपड्डी होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. प्रथम दर्जाच्या डब्यातही इतकी गर्दी असेल, तर मग त्या पासचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दाखल होताच अमित यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.  

टॅग्स :अमित ठाकरेराज ठाकरेमनसेमध्य रेल्वे