मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूईएफ) ४० अब्ज डॉलर्सचे म्हणजेच सुमारे ३.५ लाख कोटी रुपयांचे ११ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे शहरी वाहतूक, प्रादेशिक विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणूक येणार येईल आणि त्यांतून एमएमआरडीएच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
एमएमआरडीए पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासाबरोबरच रायगड येथे अटल सेतू प्रभावित भागात तिसरी मुंबई उभी करीत आहे. त्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या करारांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “करारांमुळे पायाभूत सुविधांचा विकास होईलच, पण रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल.” तर ‘दावोसमध्ये ४० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे करार होणे हा एमएमआरडीएसाठी ऐतिहासिक टप्पा आहे. शहरी विकास आणि जागतिक सहकार्याच्या क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करण्यासाठी या सामंजस्य करारांचे महत्त्व आहे. या करारांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा जागतिक आर्थिक केंद्र म्हणून उदय होण्याच्या क्षमतेवर असलेला गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
४० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे करार १२ अब्ज डॉलर्सचा करार सर्वात मोठा
एमएमआरला ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट या करारांमध्ये आहे. या भागीदाऱ्यांमुळे पायाभूत सुविधांचा विकास होणार आहेच, त्याचप्रमाणे या प्रदेशातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक शाश्वततेलाही चालना मिळेल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कोणत्या कंपन्यांशी सामंजस्य? क्रॉसरेल इंटरनॅशनल (यूके), यूके वाहतूक विभाग-धोरणात्मक अभ्यासासाठी साहाय्ययुनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम सेंटर फॉर रेल्वे रिसर्च अँड एज्युकेशन (यूके) - धोरणात्मक अभ्यासासाठी साहाय्य ब्रुकफिल्ड कॉर्पोरेशन (कॅनडा) - १२ अब्ज डॉलर्स ब्लॅकस्टोन इन्क (यूएसए) - ५ अब्ज डॉलर्स टेमासेक कॅपिटल मॅनेजमेंट पीटीई लिमिटेड (सिंगापूर) - ५ अब्ज डॉलर्स सुमिटोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (जपान) - ५ अब्ज डॉलर्सहिरानंदानी ग्रुप (भारत दुबई) - ६ अब्ज डॉलर्स के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड (भारत सिंगापूर) - ५ अब्ज डॉलर्स एव्हरस्टोन ग्रुप (सिंगापूर) - १ अब्ज डॉलर्स सोतेफिन भारत प्रायव्हेट लिमिटेड (भारत स्वित्झर्लंड) - १ अब्ज डॉलर्सएमटीसी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड मित्सुई (भारत जपान) - सर्क्युलर इकॉनॉमी साहाय्य