‘त्यांच्या’ हद्दीतील अनधिकृत बांधकामांना बसणार चाप, एमएमआरडीएकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:09 IST2025-08-08T11:08:54+5:302025-08-08T11:09:25+5:30

...त्यातून मुंबई शहरासह कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, पालघर आणि अलिबाग भागांतील एमएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना आळा बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

MMRDA appoints officers to crack down on unauthorized constructions within 'their' area | ‘त्यांच्या’ हद्दीतील अनधिकृत बांधकामांना बसणार चाप, एमएमआरडीएकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

‘त्यांच्या’ हद्दीतील अनधिकृत बांधकामांना बसणार चाप, एमएमआरडीएकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई : अनधिकृत बांधकामांना चाप बसविण्यासाठी आणि नागरी नियोजनाला शिस्त लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंबर कसली आहे. एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या ठिकाणी अनधिकृत विकासांविरोधात कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यातून मुंबई शहरासह कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, पालघर आणि अलिबाग भागांतील एमएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना आळा बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
 
एमएमआरडीएने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३ अंतर्गत अधिकृत अधिकारी नेमले आहेत. त्यांना अनधिकृत विकासांविरुद्ध वेळीच आणि कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने कठोर आणि वेळेच्या चौकटीत कारवाई सुनिश्चित करून ‘झिरो टॉलरन्स’ नीती स्वीकारली आहे. दरम्यान, पालघर आणि अलिबाग येथील विस्तारित क्षेत्रांसाठी विकास परवानग्या विकास आराखडे अंतिम होईपर्यंत त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिल्या जात राहतील.

अधिकारी कामे करतील
अनधिकृत बांधकामांची ओळख करणे
एमआरटीपी कायद्यातील कलम ५२ ते ५६ नुसार कायदेशीर कारवाई सुरू करणे पारदर्शक आणि कायदेशीर कारभारासाठी निश्चित केलेली प्रमाणित कार्यपद्धती अमलात आणणे

एसपीएमध्ये नियुक्ती
अंबरनाथ, कुलगाव-बदलापूर व परिसर अधिसूचित क्षेत्र
भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र
कल्याण ग्रोथ सेंटर
वांद्रे-कुर्ला संकुल
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र
ओशिवरा जिल्हा केंद्र 
वडाळा अधिसूचित क्षेत्र
पालघर येथील विस्तारित 
एमएमआर क्षेत्र
अलिबाग येथील विस्तारित 
एमएमआर क्षेत्र

Web Title: MMRDA appoints officers to crack down on unauthorized constructions within 'their' area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.