Join us

मुंबई मेट्रो-३ मोठी अपडेट; महिन्याच्या पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, ‘या’ सुविधेमुळे फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:40 IST

Mumbai Metro Line 3 Monthly Trip Passes: कफ परेड-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

Mumbai Metro Line 3: मुंबई, उपनगर आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामे अद्यापही सुरू आहेत. सुरू झालेल्या मेट्रो मार्गांचा लाखो मुंबईकरांना फायदा होत आहे. यातच मुंबई मेट्रो ३ बाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या महिन्याच्या पाससंदर्भात नवी सुविधा देण्यात येणार आहे. याचा मोठा फायदा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. 

कफ परेड – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर महिन्यात या मार्गिकेवरून ३८ लाख ६३ हजार ७४१ प्रवाशांनी प्रवास केला. या मार्गिकेवरून प्रतिदिन सरासरी १ लाख ४१ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

१० दिवसांत ही सूट देण्यात येणार

मुंबई मेट्रोकडून दिव्यांग प्रवाशांना २५ टक्के सूट देण्याची योजना आखण्यात आली आहे. महिन्याच्या पासवर ही सवलत असेल. तिकीट प्रणाली अपडेट झाल्यानंतर सुमारे १० दिवसांनी ही सुविधा लागू होईल. याबाबत मेट्रो प्रशासनाने माहिती दिली आहे. मुंबईतील पहिली भुयारी आणि सर्वात लांब भुयारी मेट्रो मार्गिका आरे – कफ परेड दरम्यान धावते. ऑक्टोबर २०२४ मध्ये पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला, तेव्हा या दैनंदिन प्रवासी संख्या १९ हजार होती.

दरम्यान, शेवटचा टप्पा ९ ऑक्टोबरपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. मार्गिकेला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता भविष्यात मुंबईकर मोठ्या संख्येने या मार्गिकेचा वापर करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Metro-3 Update: Monthly Pass Benefit for the Differently-Abled

Web Summary : Mumbai Metro-3 offers a 25% discount on monthly passes for differently-abled passengers. This benefit will be available after a ticketing system update, expected in ten days. Daily ridership on the line averages 1.41 lakh passengers, with increasing popularity since its launch.
टॅग्स :मुंबईमेट्रोट्रॅव्हल टिप्स