Join us

‘त्या ’ आमदारास जीवे मारण्याची धमकी, उपाध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 02:34 IST

उपाध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी देण्याच्या घटनेची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सोमवारी विधानसभेत दिले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष वेधले. नंदू उर्फ बाबा चव्हाण हा स्वत:ला मुंबई बाबा म्हणतो आणि एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा नामोल्लेख करून त्यांच्या केसालाही धक्का लावला तर राजेंद्र राऊत तुमचे दोन्ही हातपाय तोडून टाकू, अशी धमकी त्याने दिली आहे. राऊत! तुम्ही पोलीस संरक्षण घेतले असले तरी पोलिसात आमची माणसं आहेत, अशी धमकी या गावगुंडाने फेसबुकवर दिलेली आहे. अधिवेशन सुरू असताना गुंडांची एवढी हिंमत होतीच कशी, असा सवाल फडणवीस यांनी केला. त्यावर, सदर धमकीबाबत चौकशी करण्याचे आदेश उपाध्यक्षांनी दिले.

‘हिरणप्रकरणी निवेदन करा’nबेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील व्यापारी गौतम हिरण हे आठ दिवस बेपत्ता होते. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही. काल त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. nनिरपराधांचे बळी जात आहेत आणि गुंडांना संरक्षण दिले जात आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसआमदार