आमदार बच्चू कडू धावले आयएएस अधिकाऱ्याच्या अंगावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 22:51 IST2018-09-26T22:46:10+5:302018-09-26T22:51:18+5:30
आमदार बच्चू कडू व आयएएस अधिकारी यांच्या बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. महापरीक्षा पोर्टलवरून नोकर भरतीबाबत सुरू असलेल्या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी कडू कार्यकर्त्यांसह माहिती संचालक प्रदीप पी. यांच्या कार्यालयात गेले असताना हा प्रकार घडल्याचे कळते.

आमदार बच्चू कडू धावले आयएएस अधिकाऱ्याच्या अंगावर
मुंबई : आमदार बच्चू कडू व आयएएस अधिकारी यांच्यात बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. महापरीक्षा पोर्टलवरून नोकर भरतीबाबत सुरू असलेल्या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी कडू कार्यकर्त्यांसह माहिती संचालक प्रदीप पी. यांच्या कार्यालयात गेले असताना हा प्रकार घडल्याचे कळते. यावेळी बच्चू कडू टेबलवरील लॅपटॉप उचलून थेट प्रदीप यांच्यावर धावून गेले. मात्र कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी बच्चू कडू यांनी शनिवारी मुख्यमंत्री आणि अधिका-यांना पत्र लिहिले होते. त्यावर काय कार्यवाही झाली, याची विचारणा करण्यासाठी ते प्रदीप यांच्या कार्यालयात बच्चू कडू गेले होते. तेव्हा त्यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संतापलेल्या बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोंधळ घातला.
महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी
महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. महापरीक्षा हे पोर्टल स्पर्धा परीक्षांचे ढिसाळ नियोजन करुन, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.