Join us  

Mira Road Murder: ती माझ्या मुलीसारखी होती, मी एचआयव्ही पॉझिटिव्ह...; आरोपीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 8:40 AM

मीरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज साने याने चौकशीदरम्यान पोलिसांजवळ अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

काल मुंबईजवळीलमीरा रोड येथील गीता नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. आरोपी मनोज साने याने आपल्या सोबत राहणाऱ्या लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली.या आरोपीला काल पालिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तो एचआयव्ही पॉझिटिव्ह होता आणि त्याने पार्टनरसोबत कधीही  शारीरिक संबंध ठेवले नसल्याचा दावा आरोपीने  केला आहे. 

सरस्वती वैद्य ही माझ्या मुलीसारखी होती. आरोपी मनोज साने याने काल पोलिसांजवळ अनेक खुलासे केले. ३२ वर्षीय सरस्वती वैद्यने ३ जून रोजी आत्महत्या केली होती. आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असा मोठा दावा आरोपीने केला. 

मृत्यू उघडकीस आल्यानंतर बुधवारी रात्री घटनास्थळी भेट देणाऱ्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  चौकशीदरम्यान सानेच्या दाव्याची पडताळणी केली जात आहे. इलेक्ट्रिक ट्री कटरने मृतदेहाचे छोटे तुकडे केल्यानंतर, सानेने त्याचे काही भाग प्रेशर कुकरमध्ये शिजवले . त्याने कथितरित्या हे तुकडे स्वयंपाकघरात बादल्या, टब, कुकर आणि इतर भांडीमध्ये ठेवले आणि ते इतके लहान केले की पोलिसांना ते मोजताही आले नाहीत.

पोलिसांनी आयपीसी कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला ठाण्यातील न्यायालयात हजर केले असता १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  प्राथमिक चौकशीदरम्यान साने याने पोलिसांना सांगितले की, २००८ मध्ये तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे त्याला समजले. तेव्हापासून तो औषधोपचारावर आहे.

'मनोज सानेने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीनुसार, सरस्वती स्वभावाने अतिशय शांत होती . ती दहावीच्या परीक्षेला बसणार होता. सानेने तिला गणिताचा अभ्यास करण्यास सांगितले होते. पोलिसांनी फ्लॅटच्या एका भिंतीवर एक बोर्ड दिसला, ज्यावर गणितीय समीकरणे लिहिलेली होती.

टॅग्स :मीरा रोडमुंबईपोलिस