अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:46 IST2018-12-05T05:46:39+5:302018-12-05T05:46:46+5:30

मानखुर्दमध्ये एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला.

Minor girl tortured by both | अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

मुंबई : मानखुर्दमध्ये एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. यामध्ये मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून मानखुर्द पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगर परिसरात राहणारे राजेंद्र पटेल (२४) आणि संकेत बनसोडे (२३) यांनी शेजारीच राहणाºया अल्पवयीन मुलीला फूस लावून पीएमजीपी वसाहतीतील रिक्षा पार्किंगमध्ये घेऊन गेले. तिचे तोंड दाबून तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या मुलीस जबरदस्तीने व जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केला.
मात्र मुलीची तब्येत सतत ढासळू लागली. तिच्या शरीरातही बदल होत असल्याचे पाहून घरच्यांनी डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले.

Web Title: Minor girl tortured by both