Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:44 IST

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख करून तिला लग्नाचे आमिष तिच्यावर बलात्कार करणाऱ्या भागवत चंपालाल जारवाल याच्याविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

करमाड : जवळचे नातेवाईक असल्याने एका लग्नात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख करून तिला लग्नाचे आमिष तिच्यावर बलात्कार करणाऱ्या भागवत चंपालाल जारवाल याच्याविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २८ एप्रिल रोजी हुसेनपूर येथे घडली.

पीडित मुलीने करमाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, एक वर्षापूर्वी मी माझ्या आई-वडिलांसोबत जोडवाडी येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. यावेळी लग्नात भागवत जारवाल याच्याशी ओळख झाली. मी चित्तेगाव येथे ९ व्या वर्गात शिकत असून, दररोज शाळेत पायी जाते. एके दिवशी त्याने मोटारसायकलने माझा पाठलाग केला.

मी चितेगाव येथे पायी चालत असताना कचनेर फाट्याजवळ त्याने मला अडविले. त्याचवेळी माझे वडील आले. त्यांनी त्याला समज दिली. त्यांनतर २८ एप्रिल रोजी माझ्या बहिणीचे हुसेनपूर येथे लग्न होते. त्यादिवशी रात्री लग्नाचे आमिष दाखवून त्याने अत्याचार केला. यावेळी माझे काका अचानक घटनास्थळी आले.

यावेळी भागवत व त्याच्या मित्राने त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपी मोटारसायकलने पळून गेले. पोलिसांनी पीडित अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून भागवत जारवाल व त्याच्या मित्राविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :गुन्हेगारीऔरंगाबाद