Worli Crime:मुंबईतगुन्हेगारीच्या घटना वाढ होताना दिसत आहे. वरळीत तिघांनी मिळून एका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पाच्या अधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. अधिकाऱ्याची गुरुवारी एका अल्पवयीन मुलासह दोन तरुणांनी चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या काकाला एसआरएच्या अधिकाऱ्याने कामावरुन काढून टाकल्यानंतर हा सगळा प्रकार घडला.
वरळीतील एसआरए प्रकल्पाच्या पर्यवेक्षकाची गुरुवारी तीन तरुणांनी भोसकून हत्या केली. आरोपींपैकी एकाचा पर्यवेक्षकाविरुद्ध राग होता कारण त्याने त्याच्या काकांना नोकरीवरून काढून टाकले होते. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. वरळीच्या कांबळे नगर भागातील एसआरए पुनर्विकासाच्या ठिकाणी ही घटना घडली.
मोहम्मद शब्बीर अब्बास खान याने आरोपीच्या काकाला प्रकल्पाच्या ठिकाणी नोकरीवरून काढून टाकले होते आणि त्याला पगारही दिला नव्हता. त्यामुळे आरोपीला मोहम्मदचा राग होता. आरोपीने त्याच्या साथीदारांसह एसआरएच्या पर्यवेक्षकाला पहाटे प्रकल्पाच्या ठिकाणी नेले आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात खान गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खानला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी खानला तपासून मृत घोषित केलं. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे.
फेरीवाल्यांकडून लाच घेतल्याप्रकरणी चार हवालदार निलंबित
फेरीवाल्यांकडून लाच घेतल्याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कारवाई न करण्याच्या बदल्यात चौघांनी फेरीवाल्यांकडे लाच मागितल्याचा होती. पोलीस हवालदार लाच घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी कॉन्स्टेबल महेंद्र पुजारी, काशिनाथ गाजरे, गंगाधर खरात आणि आप्पासाहेब वाकचोरे यांना निलंबित करण्यात आले आहे.