Join us

नॅशनल लायब्ररीच्या अध्यक्षपदी मंत्री ॲड आशिष शेलार यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:25 IST

संस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

मुंबई-वांद्रे पश्चिम येथील १०८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नॅशनल लायब्ररीच्या अध्यक्षपदी आज राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड.आशिष शेलार यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी ते या ग्रंथालयाचे उपाध्यक्ष म्हणून सक्रिय होते. संस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.सदर सभेला ३५ सभासद उपस्थित होते. या सभेत ग्रंथालयाच्या नव्या कार्यकारणीची घोषणा सर्व प्रक्रिया पूर्ण करुन निवडणूक अधिकाऱ्यांनी केली.

२०२५ ते २०३० च्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळात अध्यक्ष ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य मंत्री),कार्याध्यक्ष- प्रमोद महाडिक,कोषाध्यक्ष- सुनील धोत्रे, प्रमुख कार्यवाह - विद्याधर झारापकर, संयुक्त कार्यवाह - तृणाल वाघ, उर्मिला रांगणेकर, प्रल्हाद महाडदळकर तर कार्यमंडळ सदस्य -ॲड. दीपक पडवळ, पांडुरंग उपळकर,अनिल जोशी,ॲड चंद्रप्रकाश नकाशे, राजेंद्र लाड, संध्या दुखंडे, विनायक हजारे (स्वीकृत), संदीप मेटकर, शांताराम चव्हाण आदींची नियुक्ती झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashish Shelar Unanimously Elected President of National Library.

Web Summary : Minister Ashish Shelar elected President of the National Library in Mumbai. He was previously the Vice President. New executive committee announced at annual meeting.
टॅग्स :आशीष शेलार