Join us

किमान उत्पन्न योजना ही फायद्याचीच; अशोक चव्हाणांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 14:34 IST

अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

मुंबई : काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने नेहमीच पूर्ण केली. राहुल गांधी यांनी छत्तीसगढमध्ये गरिबांसाठी राबविलेली किमान उत्त्पन्न योजना ही सामान्य जनतेला दिलासा देणारी आहे. काँग्रेसने यापूर्वी मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा केला. काँग्रेसने कधी जुमलेबाजी केली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली.  

अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली. 

आमचा शब्द पाळण्यासाठी आणि भाजपचा फिरवण्यासाठी, जुमलेबाजीसाठी असतो. जगात असा निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. महाराष्ट्रासाठी या निर्णयाचे परिणाम चांगले असतील. राज्य गरीब मुक्त होईल. 17.4 टक्के म्हणजेच 2 कोटी लोक थेट या योजनेचे लाभार्थी असतील. दरडोई उत्पन्नाच्या 1.3 टक्के निधी या योजनेवर खर्च होईल असे पंतप्रधानांचे सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे. त्यामुळे योजना व्यवहार्य नाही हा भाजपचा आरोप गैरलागू, असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :अशोक चव्हाणराहुल गांधी