Mineral water in the rickshaw, Unmini TV; Vinod Abhang's modern rickshaw | रिक्षात मिनरल वॉटर, अन् मिनी टीव्ही; विनोद अभंग यांची आधुनिक रिक्षा

रिक्षात मिनरल वॉटर, अन् मिनी टीव्ही; विनोद अभंग यांची आधुनिक रिक्षा

मुंबई : कित्येक वेळा भाडे नाकारणे, जास्त पैसे आकरणे यामुळे रिक्षाचालक चर्चेत असतात. पण एक रिक्षाचालक असा आहे त्याने प्रवाशांना रिक्षात टीव्हीची सुविधा आणि मिनरल वॉटर उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे नाव आहे विनोद अभंग.

विनोद अभंग हे मानखुर्द येथे राहतात. त्यांनी आपल्या रिक्षात प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांना मोफत मिनरल वॉटर दिले जाते. तसेच रिक्षात बसून तुम्ही कंटाळलात तर तुमच्या करमणुकीसाठी एक मिनी टीव्हीही आहे. रिक्षा चालवताना ते सामाजिक बांधिलकीही जपत आहेत. विशेष व्यक्तींना रिक्षा भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते.

बऱ्याच वेळा रिक्षाचालक भाडे नाकारत असतात, पण अभंग हे कोणतेही भाडे नाकारत नसून प्रवाशाला इच्छित स्थळी पोहोचवतात. त्यांच्या समाजसेवेला सलाम आहे,  असे प्रवासी प्रसाद जनध्याला यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mineral water in the rickshaw, Unmini TV; Vinod Abhang's modern rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.