मीनल तुर्डे, दीक्षा कारकर बिनविरोध, ‘महिला व बालकल्याण’, ‘विधि’ अध्यक्षपद निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:13 IST2026-03-17T13:13:03+5:302026-03-17T13:13:14+5:30
महिला व बालकल्याण आणि विधी या दोन्ही समित्यांची निवडणूक सोमवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी दोन्ही समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

मीनल तुर्डे, दीक्षा कारकर बिनविरोध, ‘महिला व बालकल्याण’, ‘विधि’ अध्यक्षपद निवडणूक
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शिंदेसेनेच्या मीनल तुर्डे यांची, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या रिटा मकवाना यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विधि समितीच्या अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या दीक्षा कारकर, तर उपाध्यक्षपदी भाजपचे अनिष मकवानी यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
महिला व बालकल्याण आणि विधी या दोन्ही समित्यांची निवडणूक सोमवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी दोन्ही समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. या दोन्ही पदांच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अनुक्रमे महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांनी काम पाहिले. यावेळी उपायुक्त (सामन्य प्रशासन) किशोर गांधी, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर आणि पालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, सर्वच समित्यांचा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून कोणीही अर्ज भरले नव्हते. त्यामुळे महायुतीचा एकतर्फी विजय झाला आहे.
याआधी पार पडलेल्या समित्यांच्या अध्यक्षपदी महायुतीनेच बाजी मारली आहे.