गिरणी कामगारांनो, तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत का? म्हाडाचे घर मिळण्यासाठी विशेष अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 09:33 IST2023-10-05T09:32:24+5:302023-10-05T09:33:35+5:30

ऑनलाइन सुविधेअंतर्गत अद्यापपर्यंत ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.

Mill workers, do you have these documents? Great response to the special campaign to get Mhada's house | गिरणी कामगारांनो, तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत का? म्हाडाचे घर मिळण्यासाठी विशेष अभियान

गिरणी कामगारांनो, तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत का? म्हाडाचे घर मिळण्यासाठी विशेष अभियान

मुंबई : गिरणीमध्ये काम करत होते याचा पुरावा म्हणून अपेक्षित असलेल्या १३ पैकी जास्तीत जास्त कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने म्हाडाच्या वेबसाइटवर किंवा ॲपद्वारे अपलोड केली असल्यास त्यांना प्रत्यक्ष येऊन कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. ज्या गिरणी कामगार / वारसांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन कागदपत्रे सादर करायची आहेत त्यांनी समाज मंदिर हॉल येथे कागदपत्रे जमा करावीत. ऑनलाइन सुविधेअंतर्गत अद्यापपर्यंत ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.

१ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. म्हाडा मार्फत ५८ बंद गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीत यशस्वी झाले नाहीत अशा १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगारांकरिता आयोजित अभियानास अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान म्हाडा कार्यालयाजवळील एम.आय.जी. क्रिकेट ग्राउंडसमोर, गांधीनगर, वांद्रे (पूर्व) येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

ही कागदपत्रे आहेत गरजेची

गिरणी कामगाराचे ओळख पत्र, तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रोव्हिडंट फंड क्रमांक, ईएसआयसी क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती, आधार कार्ड आणि इतर तत्सम कागदपत्रे

गिरणी कामगार व त्यांचे वारस म्हाडा मुख्यालयात येत आहेत, परंतु कागदपत्रे सोईनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन यापैकी कोणत्याही एका प्रकारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध गिरणी कामगार यांना घेऊन प्रवास करत म्हाडा कार्यालयात येण्यापेक्षा कागदपत्रे सादर करण्याकरिता ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा.   

- मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा

संपर्क करण्याचे आवाहन

ॲपबाबत माहिती देण्याकरिता सर्व गिरणी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींकरिता मंडळातर्फे सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असल्याने संबंधित गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील संपर्क करावा.

Web Title: Mill workers, do you have these documents? Great response to the special campaign to get Mhada's house