दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद

By Admin | Updated: September 30, 2014 21:39 IST2014-09-30T21:39:49+5:302014-09-30T21:39:49+5:30

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद

Milk bonded gang | दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद

धात भेसळ करणारी टोळी जेरबंद
मुंबई : नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी भरुन त्याची विक्री करणार्‍या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी ३५ हजारांचे भेसळयुक्त दूध हस्तगत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरारात मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी अंधेरीतील वीरा देसाई रोडवरील जीवन नगर आणि कदम चाळ तसेच जोगेश्वरीतील सहकार रोड अशा तीन ठिकाणी एकाच वेळी छापे मारले. यावेळी पोलिसांनी ७५८ लीटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले. याठिकाणी नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये दुषित पाणी घालून या दुधाची विक्री केली जात होती. त्यानुसार पोलिसांनी ही भेसळ करणार्‍या सिनू बोबला (३०), बाळू शतराशी (३४) श्रीनी मल्लय्या (३०) या तिघांनी अटक केली. मात्र पोलिसांची भनक लागताच यातील दोन आरोपींनी पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Milk bonded gang