मिलिंद सोमण-अंकिताचं ठरलं ! या गोष्टीमुळे झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 13:50 IST2018-04-09T13:50:59+5:302018-04-09T13:50:59+5:30

आर्यन मॅन मिलिंद सोमणच्या चाहतींचं हार्ट ब्रेक करणारी एक बातमी समोर आली आहे.

milind soman ankita konwar may be engaged | मिलिंद सोमण-अंकिताचं ठरलं ! या गोष्टीमुळे झाला खुलासा

मिलिंद सोमण-अंकिताचं ठरलं ! या गोष्टीमुळे झाला खुलासा

मुंबई - आर्यन मॅन मिलिंद सोमणच्या चाहतींचं हार्ट ब्रेक करणारी एक बातमी समोर आली आहे. वयामध्ये असलेल्या मोठ्या अंतरामुळे मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवरच्या प्रेमप्रकरणाची चर्चा बरीच रंगलीय. मिलिंदचे वय 52 वर्ष आणि अंकिता 27 वर्षांची आहे. अशातच मिलिंद व अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पण एका वेगळ्याच कारणामुळे... या दोघांनी आपल्या नात्याला नवीन नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. अंकितानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, यामध्ये मिलिंद व अंकितानं एकमेकांचा हात पकडला असून, अंकिताच्या बोटामध्ये अंगठीदेखील दिसत आहे.   

अंकितानं पोस्ट केलेल्या या एका फोटोवरुन सोशल मीडियावर नेटीझन्सनी अनेक अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. फोटोवरुन मिलिंद-अंकितानं साखरपुडा केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद काही महिन्यांपूर्वी अंकिताचं मूळ गाव गुवाहाटीमध्ये गेला होता. अंकिताच्या एका कौटुंबिक सोहळ्यात तो सहभागीदेखील झाला होता. यावेळी मिलिंदनं अंकितासोबत आपले नाते पुढे वाढवण्याबाबत तिच्या पालकांसोबत बोलणी केल्याची माहिती समोर आली आहे. 

यावर्षी लग्नबेडीत अडकणार मिलिंद-अंकिता?
दोघांच्या वयात असलेल्या अंतरामुळे अंकिताच्या पालकांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. मात्र जेव्हा त्यांनी मिलिंदची भेट घेतली त्यावेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मिलिंदच्या एकूण वागण्याबोलण्यानं तिचं कुटुंबीय प्रचंड खूश झाले होते. 
दरम्यान, हे मिलिंदचं दुसरं लग्न असेल. 2006 साली त्यानं अभिनेत्री मिलिन जॅम्पनोईसोबत लग्न केलं होतं, मात्र दोन-तीन वर्षात त्यांच्या नात्यात कटुता आली. दोघांनी घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  
 

Web Title: milind soman ankita konwar may be engaged