आली लग्नघटिका समीप : मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाची तयारी जोरात, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 17:15 IST2018-04-21T17:10:53+5:302018-04-21T17:15:56+5:30
मॉडेल-अभिनेता-आर्यन मॅन मिलिंद सोमणच्या लाखो चाहतींचं हार्ट ब्रेक करणारी बातमी समोर आली आहे.

आली लग्नघटिका समीप : मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाची तयारी जोरात, फोटो व्हायरल
अलिबाग - मॉडेल-अभिनेता-आर्यन मॅन मिलिंद सोमणच्या लाखो चाहतींचं हार्ट ब्रेक करणारी बातमी समोर आली आहे. अखेर मिलिंद सोमण गर्लफ्रेन्ड अंकिता कोवरसोबत बोहल्यावर चढणार आहे. दोघांच्या लग्नाच्या विधि सध्या अलिबाग येथे सुरू आहेत. अलिबागमध्ये मोजके मित्र-मैत्रिण आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू आहे. केवळ 90च्या दशकातीलच नव्हे तर आताही लाखो तरुणींचा क्रश असलेला मॉडेल मिलिंद सोमणच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिलिंद आणि अंकिताचा मेहंदी सोहळा शनिवार (21 एप्रिल) सकाळी अलिबागमध्ये उरकण्यात आला. लवकरच लग्नबेडीत अडकणाऱ्या या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर त्यांच्या मित्रमैत्रिणींनी शेअर केले आहेत.
फुलांच्या दागिन्यांनी सजली अंकिता
मेहंदी सोहळ्यात अंकितानं पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. दागिन्यांऐवजी ती फुलांनी सजलेली पाहायला मिळाली. तर मिलिंद सोमणनं पांढऱ्या रंगाची लुंगी आणि कुर्ता असा पारंपरिक वेश परिधान केला होता. मिलिंद-अंकिताच्या लग्नसोहळ्यासाठी अलिबागमधील रिसॉर्टची पिवळ्या व नारंगी रंगांच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती.
52 वर्षांचा मिलिंद आपल्याहून 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोवरला 2015पासून डेट करत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेक अप झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पण स्वत: मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेन्ड अंकिताने ही चर्चा करणा-यांना सडेतोड उत्तर दिलं. मिलिंदला त्याच्या गर्लफ्रेन्डने पैशांसाठी सोडल्याची चर्चा सुरू होती. पण दोघांनीही ही चर्चा करणा-यांची एक शब्दही न बोलता तोंड बंद केली आहेत.
मिलिंद सोमणने त्याच्या इन्स्टाग्रामवर अंकिता आणि त्याचा फोटो शेअर करत #focus #BetterHabits4BetterLife #surroundedbylove अशाप्रकारचे हॅशटॅग दिले होते. याद्वारे दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं स्पष्ट झाले होते.