Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर; राज्यात १०० पर्सेंटाइलचे २८ विद्यार्थी

By सीमा महांगडे | Updated: June 12, 2023 11:41 IST

एमएचटी सीईटीचा निकाल वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला आहे.  सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात.   

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  निकाल जाहीर झाला असून प्रतीक्षा संपली असून एकूण २८ विद्यार्थ्याना १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त झाले आहेत. 

इथे पाहाल निकालwww.mahacet.org and www.mahacet.in

टॅग्स :शिक्षणमुंबई