MHADA Jobs : म्हाडामध्ये लवकरच होणार पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांची मेगाभरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:51 IST2019-12-17T05:51:24+5:302019-12-17T05:51:37+5:30
MHADA MEGA Recruitment 2019

MHADA Jobs : म्हाडामध्ये लवकरच होणार पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांची मेगाभरती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात नवे सरकार आल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली असून यातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या विविध मंडळांमध्ये सुमारे ७०६ जागा रिक्त असून येत्या काही दिवसांतच सुमारे ५३४ जागांसाठी मेगाभरती करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळासह विविध नऊ मंडळे आहेत. यामध्ये गृहनिर्माण प्रकल्प, रेन्ट कलेक्शन, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामांसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. म्हाडाच्या मुंबई आणि कोकण विभागामार्फत काढण्यात आलेल्या लॉटरीधारकांना अद्याप घराचा ताबा मिळाला नाही. विविध कार्यालयांतील सुमारे ७०६ पदांवर कर्मचारी नसल्याने कामे खोळंबत आहेत. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यासह गेली काही वर्षे म्हाडामध्ये कंत्राटी पद्धतीने काम कारणाºयांना कायम करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.