पोलिसांसाठी म्हाडाची विरार, बोळिंजमध्ये १०९ घरांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 03:50 AM2019-11-23T03:50:43+5:302019-11-23T03:50:53+5:30

२७ नोव्हेंबरला सोडत

Mhada Virar for police, lottery of 90 houses in Bolinj | पोलिसांसाठी म्हाडाची विरार, बोळिंजमध्ये १०९ घरांची लॉटरी

पोलिसांसाठी म्हाडाची विरार, बोळिंजमध्ये १०९ घरांची लॉटरी

Next

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार, बोळिंज येथे उभारण्यात आलेल्या इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिकांपैकी १०९ घरांची संगणकीय सोडत २७ नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता काढण्यात येईल. या सोडतीसाठी पालघर जिल्ह्यातील पोलीस दलातील १०९ पोलीस कर्मचाऱ्यांचे अर्ज म्हाडाकडे आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने म्हाडा विनियम १३ (२)अंतर्गत विरार, बोळिंज येथील टप्पा-३ मधील इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिका पालघर जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी वितरण करण्याबाबत मान्यता दिली आहे. म्हाडा पोलिसांसाठी १८६ घरांची लॉटरी काढणार होती. मात्र, काही पोलिसांच्या बदल्या झाल्याने म्हाडाकडे १०९ जणांचे अर्ज आले. यामुळे आता या १०९ जणांमध्ये लॉटरी काढण्यात येणार असल्याचे कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. या अर्जदारांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याची निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुमारे १५ विजेत्या अर्जदारांना ‘प्रथम सूचना पत्राचे’ वाटपदेखील केले जाणार आहे. विरार, बोळिंज येथे योजनेच्या ठिकाणी काढण्यात येणाºया या सोडतीला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी माधव कुसेकर, पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह आदी उपस्थित राहतील.

Web Title: Mhada Virar for police, lottery of 90 houses in Bolinj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा