मुंबईत महिलांसाठी म्हाडा उभारणार सुसज्ज वसतिगृह, १००० महिलांच्या राहण्याची सोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 06:50 IST2021-04-14T05:01:09+5:302021-04-14T06:50:00+5:30
MHADA : मुंबईत राज्यभरातून महिला नोकरी करण्यासाठी येतात, मात्र त्यांना कार्यालयाच्या जवळ राहणे शक्य होत नाही.

मुंबईत महिलांसाठी म्हाडा उभारणार सुसज्ज वसतिगृह, १००० महिलांच्या राहण्याची सोय
मुंबई : एक हजार महिलांच्या राहण्याची सोय असलेले सुसज्ज असे वसतिगृह म्हाडातर्फे दक्षिण मुंबईतील ताडदेव भागात म्हाडातर्फे उभारण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही घोषणा केली.
मुंबईत राज्यभरातून महिला नोकरी करण्यासाठी येतात, मात्र त्यांना कार्यालयाच्या जवळ राहणे शक्य होत नाही. कार्यालयापासून दूर उपनगरांमध्ये राहावे लागत असल्याने रोजच्या प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. ही गरज ओळखून ताडदेव येथील एम.पी. मिल कम्पाउंड परिसरात महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येईल.
हे सुसज्ज वसतिगृह साधारण दीड ते दोन वर्षांत उभारले जाणार असून सहा महिन्यांत त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
३५ कोटी खर्च, देखभाल स्वतंत्र संस्थेकडे
या कामासाठी अंदाजे ३५ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. देखभाल दुरुस्तीचे काम स्वतंत्र संस्था करेल. त्यामुळे गुणवत्ता व सुविधांवर परिणाम होणार नाही, असे आव्हाड म्हणाले.
मंत्रालय, मुंबई सेंट्रल,
महालक्ष्मी, ग्रँट रोड ही
महत्त्वूपर्ण ठिकाणे जवळ.
महिलांचा वेळ व प्रवासाचा
त्रास वाचणार.
४५० खोल्यांची व्यवस्था,
सर्व सुविधांनी युक्त.