Join us
Daily Top 2Weekly Top 5

MHADA Lottery 2026: म्हाडा प्रथम येणाऱ्यांना १२० घरे विकणार, मुंबईत मोक्याच्या जागी ३१ लाखांपासून सुरुवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 19:31 IST

Mumbai MHADA Lottery 2026 FCFS: प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील घरांच्या विक्रीसाठी ५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना/घरे निश्चिती करणे प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : म्हाडाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील १२० घरे ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विकली जाणार आहेत. घरांच्या किंमतीबाबत म्हाडाने स्पष्टता केली नसली तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची कमीत कमी किंमत ३१ लाख असणार आहे. तर जास्तीत जास्त किंमत ८ कोटी असेल. ८ कोटींची घरे ताडदेव येथील असतील. दरम्यान, यापूर्वी लॉटरीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र रिक्त राहिलेल्या घरांचा यात समावेश आहे.

म्हाडाच्या घरासाठी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज नोंदणी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना /घर निश्चिती करणे या प्रक्रियेला १२ फेब्रुवारीच्या सकाळी ११ पासून सुरुवात होणार आहे. घरच्या विक्री किमतीचा १० टक्के रकमेचा भरणा घर निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत करणे आवश्यक आहे.

अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटन दिसेल. त्यावर विंग/इमारत क्रमांक, घर क्रमांक, मजला याची माहिती असेल. अर्जदार त्यांना हवे असणारे घर उपलब्ध असल्यास निवडू शकतात. घर निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत घराची विक्री किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरणा आवश्यक असेल. रकमेचा भरणा केल्यानंतर ती रक्कम म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने घराची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.

घराची निश्चिती करण्यापूर्वी आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. अर्जदाराने अनामत रकमेचा भरणा करून घर निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत घराच्या विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये १० टक्के कमेचा भरणा न केल्यास घरावरील दावा रद्द होईल. सर्व रकमा एनईएफटी/आरटीजीएस/नेट बँकिंग/यूपीआय/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणेच आवश्यक आहे. तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर ९० दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. कालावधीत भरणा न केल्यास अधिकतम ९० दिवसांची मुदतवाढ घेऊन व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे. कसूर केल्यास वितरण कारण न देता, मुदत संपताच रद्द करण्यात येईल. दलाल नेमलेले नाहीतम्हाडाने प्रॉपर्टी एजंट नियुक्त केलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला म्हाडा जबाबदार राहणार नाही. अर्जदारास कोणी दलाल / व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी/प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा. कुठे किती घरे ?- शिंपोली कांदिवली ८- चारकोप सेक्टर-८ कांदिवली २ सदनिका- अँटॉप हिल-वडाळा २७ - तुंगा पवई ४४ - पीएमजीपी मानखुर्द १ - मालवणी मालाड १- गायकवाड नगर मालवणी-मालाड १ एकूण ८४विकास नियंत्रण नियमावली ३३(५) (७) अंतर्गत प्राप्त घरे- घाटकोपर पूर्व २ - कन्नमवार नगर विक्रोळी १ - अँटॉप हिल-वडाळा ८- भायखळा ६- ताडदेव ६ - लोअर परळ ४ - सायन २ - जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम ७ एकूण ३६ 

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Lottery: 120 Homes Up For Grabs, Prices Start at ₹31 Lakh

Web Summary : MHADA offers 120 homes on a first-come, first-served basis. Online registration starts February 5th. Prices range from ₹31 lakh to ₹8 crore. A 10% deposit is required within 48 hours of selection, with balance due in 90 days.
टॅग्स :म्हाडा लॉटरीसुंदर गृहनियोजनमुंबईघाटकोपर