म्हाडाने थकविला ६३.२१ कोटींचा कर; महापालिकेकडून बड्या थकबाकीदारांची यादी जाहीर : कर न भरल्यास आता थेट लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 07:39 IST2026-02-15T07:38:44+5:302026-02-15T07:39:30+5:30
मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या ‘टॉप २०’ मालमत्ताधारकांची यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.

म्हाडाने थकविला ६३.२१ कोटींचा कर; महापालिकेकडून बड्या थकबाकीदारांची यादी जाहीर : कर न भरल्यास आता थेट लिलाव
मुंबई : कोट्यवधी रुपयांचा थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी वारंवार सूचना देऊनही तो न भरणाऱ्या मुंबईतील आणखी ‘टॉप २०’ थकबाकीदारांची यादी महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सर्वसामान्यांना घरांचे स्वप्न दाखविणारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ही सरकारी संस्था ६३ कोटी २१ लाख रुपयांच्या थकबाकीसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सुशीलकुमार संभाजी शिंदे प्रतिष्ठानचाही या यादीत समावेश आहे.
मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या ‘टॉप २०’ मालमत्ताधारकांची यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यात ६३ कोटी २१ लाख रुपयांच्या थकबाकीसह अव्वल स्थानी असलेल्या म्हाडासह सर्व मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस महापालिका प्रशासनाने बजावली आहे.
प्रथम वस्तूंची जप्ती
आर्थिक क्षमता असूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ ते २०६ नुसार कारवाई केली जाईल. यामध्ये प्रथम मालमत्तेतील चीजवस्तू जप्त करून लिलाव केला जाईल. तरीही वसुली न झाल्यास थेट मालमत्तेचाच लिलाव केला जाईल, असा इशारा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.
‘हिट लिस्ट’मधील बडे थकबाकीदार
थकबाकीदार थकीत कर (रुपयांत)
म्हाडा ६३ कोटी २१ लाख ४० हजार ५९१
मे. राजहंस असोसिएट्स ४६ कोटी ०५ लाख २७ हजार ०६५
मे. विमल असोसिएट्स ३९ कोटी ०९ लाख ८५ हजार ०८५
नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन १० कोटी ३६ लाख ८१ हजार ०४८
नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन १० कोटी २० लाख ७८ हजार ५८९
यशवंत एन. जाधव एसएसव्ही रिऍल्टर्स ९ कोटी ९४ लाख ७० हजार १४५
अंबिका सिल्क मिल ९ कोटी ६४ लाख ९० हजार ९८२
सुशीलकुमार संभाजी शिंदे प्रतिष्ठान ८ कोटी ७९ लाख २९ हजार ९४८
द व्हिक्टोरिया मिल्स लिमिटेड (प्लाझा पंचशील) ८ कोटी ७६ लाख ६८ हजार ००६
नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ८ कोटी ०८ लाख ७० हजार ३२८
मोहम्मद युसूफ खान ७ कोटी ६४ लाख ८९ हजार ०३६
एएच वाडिया ट्रस्ट स्कायलिंक डेव्हलपर्स ७ कोटी ५६ लाख ७८ हजार २७२
मेहरून्निसा मोहम्मद साहेब खतीब ७ कोटी ३३ लाख ८० हजार ७११
द न्यू सन मिल कॉम लिमिटेड (शुभम फॅब्रिक) ७ कोटी १९ लाख ३० हजार ०४७
जय माता दी कन्स्ट्रक्शन ५ कोटी ७९ लाख ३५ हजार ५६३
ट्रान्सकॉन ट्रायम्फ फेज २ प्रायव्हेट लिमिटेड ५ कोटी ७८ लाख १० हजार ५५२
ट्रान्सकॉन ट्रायम्फ फेज २ प्रायव्हेट लिमिटेड ५ कोटी ५६ लाख ५५ हजार ८९७
नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ५ कोटी ३५ लाख १८ हजार १३८
एल्को आर्केड सहकारी गृहनिर्माण संस्था ४ कोटी ८१ लाख १२ हजार ०४६
गोल्डन रॉयल टॉकीज ४ कोटी २२ लाख ६७ हजार ४१५